कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : गानकोकीळा लता मंगेशकर यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं. ब्रीच कँडी रूग्णालयात निधन झाल्यानंतर त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. यामध्ये अनेक व्हिडीओ आहेत. या व्हायरल व्हिडीओ मागील व्हायरल सत्य सांगितलंय डॉक्टर प्रतीत समदानी यांनी. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

८ जानेवारी रोजी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली म्हणून ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं. यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू झाले. पण त्यापूर्वीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


लता दीदींना दोघींनी धरलं आहे. लता दीदींचा हा घरातील व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ जानेवारी महिन्यातीलच असावा, अशी माहिती स्वतः डॉ प्रतीत समदानी यांनी दिली आहे. (EXCLUSIVE : जेव्हा माणसातला देव गानसरस्वतीला जगण्याचा संघर्ष हरताना पाहतो....)



त्यानंतर आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये लता दीदी व्हिलचेअरवर बसल्या आहेत. लता दीदी यांनी कोरोनावर मात केली. त्यानंतर त्यांना न्यूमोनियाची लागण झाली. 


हळूहळू लता दीदी यांच्या शरीरातील अनेक अवयव काम करण बंद झालं. त्यावेळी त्यांची परिस्थिती थोडी बिकट होती. त्यावेळेचा हा व्हिडीओ आहे.


ज्या व्हिडीओमध्ये डॉ. प्रतीत समदानी त्यांना कशा आहात दीदी? असा प्रश्न विचारत आहेत. लता दीदी त्या प्रश्नाला खास उत्तर देताना दिसत नाहीत. 


हा व्हिडीओ ३१ जानेवारी २०२२ चा असून ब्रीच कँडी रूग्णालयातील आहे. लता दीदींचा हा शेवटचा व्हिडीओ आहे. जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.